हैदराबादमध्ये नवजात बालकांसाठी धात्री मिल्क बँकेच्या रूपाने एक अनोखा पर्याय उपलब्ध झालाय. स्तनपान करणाऱ्या माता आपलं दूध या बँकेत देतात. ज्या मातांना दूध कमी येतं अशा मातांच्या बाळांसाठी या दुधाचा वापर केला जातोय. या दुधाचं पाश्चरीकरण करून मगच ते बाळांना देण्यात येतं. सध्या संपूर्ण देशात अशा केवळ १८ मिल्क बँक असून आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधली ही एकमेव बँक आहे. _
0 Comments