शिवसेनेच्या जाहीरनाम्याप्रमाणे राज्यभरात अवघ्या १० रुपयांत पौष्टिक जेवण या योजनेला म्हणजेच शिवभोजन थाळी योजनेला २६ जानेवारीपासून सुरुवात झाली. यामध्ये चांगल्या दर्जाचं जेवण देखील पुरवलं जात आहे. मात्र, अनेकांना २ वाजेपर्यंतच जेवणाचे कूपन आणि तेही दिवसाला फक्त १०० कूपन वाटप होत असल्यामुळे जेवण मिळालंच नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना ५० रुपये खर्चून थाळी खरेदी करावी लागली.
0 Comments